महालक्ष्मी चाट भंडार
- NSBT
- Aug 21
- 2 min read
Updated: Aug 24

एका कुटुंबाच्या स्वप्नाची गोष्ट — एका प्लेटमधून उलगडणारा प्रवास
छत्रपती संभाजीनगरच्या मध्यवर्ती भागात महालक्ष्मी चाट भंडारने एका लहानशा कौटुंबिक स्वप्नापासून सुरुवात करून आज एक विश्वासार्ह नाव कमावलं आहे. या प्रवासाची सुरुवात झाली, जेव्हा श्री. मुकेश शर्मा यांनी आपल्या वडिलांना – श्री. अशोक शर्मा यांना हॉटेलच्या स्वयंपाकघरात काम करताना पाहून, त्यांच्यासोबत एक चाटची दुकान सुरू करण्याचा निर्णय घेतला. ताजेपणा आणि गुणवत्ता यावर त्यांनी कधीच तडजोड केली नाही. आजही प्रत्येक प्लेट स्वतः बनवली जाते, जेणेकरून ग्राहकांना आवडणारी अस्सल चव तशीच टिकून राहते. महालक्ष्मी चाट भंडार हे फक्त खाणं नाही – तर सातत्य, मेहनत आणि कौटुंबिक मूल्यांचा वारसा आहे, जो प्रत्येक प्लेटसोबत दिला जातो.
चव आणि परंपरेचा आरंभ
महालक्ष्मी चाट भंडार यांची कहाणी दुकान सुरू होण्याच्या आधीच सुरू झाली होती. लहानपणी श्री. मुकेश शर्मा आपल्या वडिलांना हॉटेलच्या स्वयंपाकघरात काम करताना पाहत बसायचे - त्या वेळी खमंग सुगंध, गरमागरम चव आणि अन्नामुळे लोकांच्या चेहऱ्यावर उमटणारा आनंद त्यांना भुरळ घालायचा.
तेच क्षण त्यांच्यामध्ये एक स्वप्न रुजवत होते - एक दिवस स्वतःचं खाद्यपदार्थाचं ठिकाण उभं करायचं. वडिलांच्या साथीने त्यांनी ते स्वप्न छत्रपती संभाजीनगरमध्ये प्रत्यक्षात उतरवलं. कासरळ सोप्या पद्धतीने सुरुवात करून हातकौशल्य, जुन्या पारंपरिक रेसिपीज, आणि विश्वास की चव आणि मेहनत यालाच आपले भांडवल बनविले.
विकासाची दिशा
पहिल्याच दिवसापासून हा एक खऱ्या अर्थाने कुटुंबाचा व्यवसाय होता. वडील आणि मुलगा सगळं करत - चिरणं, शिजवणं, वाढणं, आणि दुकानाची स्वच्छता. ठराविक वेळ नव्हता - शेवटचा ग्राहक गेल्यावर आणि दुकान नीट स्वच्छ झाल्यावरच काम संपत असे.
स्पर्धा भरपूर होती, पण त्यांनी लक्ष केंद्रित केलं - जर अन्न ताजं असेल आणि चव कायम असेल, तर लोक नक्की परत येतील.
आणि ते खरं ठरलं. हळूहळू, नियमित ग्राहकांनी इतरांनाही आणलं. विश्वास वाढला. ब्रँड कुठल्याही जाहिरातीशिवाय तयार झाला - फक्त तोंडी प्रचार आणि तत्पर सेवेमुळेच.
कसोटीचे क्षण
अनेक वेळा नफेचे आकडे फारच कमी असायचे. काही दिवस खर्चही भरून यायचा नाही. भरवश्याचे कामगार मिळणं हे कायमचं आव्हान होतं. पण हार मानणं कधीच पर्याय नव्हता. कामगार नसल्यानं, सगळं घरचं लोकं करत.
श्री. मुकेश शर्मा यांनी स्वतः पुन्हा स्वयंपाकघरात उतरून चव टिकवून ठेवण्याचं काम सुरू केलं - आणि ते अजूनही चालू आहे. आजही प्रत्येक प्लेट स्वतःच्या हातानं बनवली जाते, जेणेकरून ग्राहकांना नेहमीसारखीच चव अनुभवायला मिळेल.
व्यावसायिक तत्त्वज्ञान
तेव्हाच्या मूल्यांवरच आजचा व्यवसाय उभा आहे:
· सर्व काही ताजं शिजवा
· प्रामाणिकपणे सेवा द्या
· शॉर्टकट कधीच घेऊ नका
स्वतः जेवण तयार करणं ही केवळ परंपरा नाही, ती ग्राहकांशी असलेली नाती जपण्याची जबाबदारी आहे. वर्षानुवर्षे, प्रत्येक घासातून जपलेला विश्वास, हीच त्यांची खरी कमाई आहे.
आगामी वाटचाल
पुढच्या काळात त्यांची इच्छा आहे की दुकान वाढवावं - आणखी शाखा उघडाव्यात. पण ती वाढ त्यांच्या खास गोष्टी गमावता कामा नये.
“आमच्यासाठी हे चाट विकण्याविषयी नाही — आम्हाला अभिमान वाटेल असं काहीतरी लोकांना वाढण्याविषयी आहे - एका प्लेटमध्ये.”





Comments